
ब्रेकअप केला म्हणून बाँयफ्रेंड भडकला , गर्लफ्रेंड च्या घरी ऑर्डर केले तब्बल 300 कॅशऑन डिलिव्हरी बॉक्सेस ।
पश्चिम बंगालम,
दिनांंक 12/4/25.
पश्चिम बंगालमध्ये एका २४ वर्षीय बँक कर्मचाऱ्याने ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी विचित्र मार्ग निवडला. नोव्हेंबर २०२४ मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर त्याने एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने दररोज कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल मागवायला सुरुवात केली. चार महिन्यांत तिच्या पत्त्यावर सुमारे ३०० बॉक्स पोहोचले. त्रस्त होऊन तिने पोलिसांकडे तक्रार केली. तपासात सुमन सिकदर (२५) या तरुणाचा हात असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.