
ब्रेंकिग ,
ताडोबा अभयारण्यात पर्यटकांसमोरच कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने केले ठार..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर :/
दिनांक 25 जाने.24 .
चंद्रपूर 🙁 ताडोबा )अभयारण्यात पर्यटकांसमोरच कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना आज दिनांक 25 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली असून पर्यटकांमध्ये व तेथील कर्मचाऱ्यांमध्ये एकच थरार निर्माण झालेला आहे. सदर घटनेत वाघाने ठार केलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव- रामभाऊ रामचंद्र हनुमते वय 54 वर्षे असे असून ताडोबा बप्पर क्षेत्रातील नीमटेला या क्षेत्रात सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला असून ते सकाळी साफसफाई करून कवठाच्या झाडाजवळ गेले असता तिथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून फरकळत नेऊन ठार केले. रामभाऊ हनुमते हे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून निमटेला गेटवर रुजू होऊन कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होते.
रामभाऊ हनुमते यांचा मुलगा रंजीत हनुमते ताडोबा अभयारण्यात गाईडचे काम करतो सकाळच्या सुमारास जंगल सफारीचे काम सुरू असताना पर्यटकांसमोरच हा प्रकार घडल्याने एकच थरार निर्माण झालेला असून दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.