तुम्ही खात असाल व्हेज बिर्याणी तर सावधान! चक्क व्हेज बिर्याणी मध्ये आढळल्या अळ्या ;बालाजी फ्रुड कॉर्नर ,साउथ इंडियन रेस्टॉरंट मधील प्रकार …
मुख्य संपादक

तुम्ही खात असाल व्हेज बिर्याणी तर सावधान! चक्क व्हेज बिर्याणी मध्ये आढळल्या अळ्या ;बालाजी फ्रुड कॉर्नर ,साउथ इंडियन रेस्टॉरंट मधील प्रकार …
चंद्रपूर / वरोरा ,
चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातील बालाजी फूड कॉर्नर या साऊथ इंडियन रेस्टोरेंट मधील व्हेज बिर्याणी मध्ये अळी आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत युवासेनेने अन्न व औषधी प्रशासनाला तक्रार देत रेस्टोरेंट चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज इमारतीच्या ग्राउंड फ्लोर मध्ये स्थित बालाजी फूड कॉर्नर साऊथ इंडियन रेस्टोरेंट आहे.
या रेस्टोरेंट मध्ये दोसा, उपमा व नव्याने सुरु केलेली व्हेज बिर्याणी मिळते, अल्पावधीत या हॉटेलमधील व्हेज बिर्याणी प्रसिद्ध झाली मात्र आज एका ग्राहकाने सदर बिर्याणी ऑर्डर केली मात्र त्यामध्ये अळी आढळली. त्याचा व्हिडीओ काढत सदर प्रकरण ग्राहकाने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यासमोर ठेवले. विक्रांत सहारे यांनी वेळ न गमावता अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय गाठत लेखी तक्रार दिली.
हॉटेल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा हि मागणी सहारे यांनी यावेळी केली.
विशेष बाब म्हणजे ज्या परिसरात हा हॉटेल आहे त्याठिकाणी रुग्णालय व विविध कार्यालये आणि महाविद्यालय आहे. दुपारच्या सुमारास अनेक नागरिक या हॉटेलमध्ये येत असतात. अवघ्या काही पैश्यासाठी हॉटेल चालक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया विक्रांत सहारे यांनी दिली आहे. ज्याठिकाणी या हॉटेलमधील विविध पकवान बनविल्या जातात ते किचन अत्यंत घाणेरडं आहे. युवासेनेने तक्रार दिल्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हॉटेलमध्ये दाखल झाले मात्र अद्याप काही ठोस कारवाई झाली नाही.