आरोग्य व शिक्षण
लातूर मधील बोगस शाळेला 20 लाख रुपयाचा दंड ; शिक्षण विभागाची मोठी कारवाई।
मुख्य संपादक

लातूर मधील बोगस शाळेला 20 लाख रुपयाचा दंड ; शिक्षण विभागाची मोठी कारवाई।
लातुर ,
शासनाची परवानगी न घेता राजरोसपणे बोगस शाळा चालविल्या जातात. लातूरमध्ये अशाच प्रकारे सुरु असलेल्या बोगस शाळेला तब्बल 20 लाख रुपयांचा दंड ठोठावर शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत राजरोसपणे शाळा अजूनही सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. लातूरमधील या बोगस शाळा सुरु असल्याबाबतची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत शिक्षण विभागाने बोगस शाळेवर कारवाई करत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.