वैनगंगा नदी पात्रात नाव उलटल्याने ६ जणांना जलसमाधी तर दोघांना मिळाले जीवदान
मुख्य उपसंपादक
वैनगंगा नदी पात्रात नाव उलटल्याने ६ जणांना जलसमाधी तर दोघांना मिळाले जीवदान…
दोन महिलांचे मिळाले मृतदेह तर चार महिलांची शोध मोहीम सुरू..
गडचिरोली .
चामोर्शी :- चामोर्शी तालुक्यातील गणपुर(रै.) येथील वैनगंगा नदी पात्रातून मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याची घटना आज दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी घडली असून अचानक कोणतीही माहिती न देता चिचडोहचे पाणी सोडल्याने मिरची तोडण्याकरिता गणपुर येथील महिना नावेने जात असताना अचानक पाण्याचा स्त्रोत वाढल्याने नाव पाण्यात बुडाली असून त्या नावेत सात महिला व एक नावी प्रवास करीत होते. त्यापैकी नाव चालक श्री. नामे. सदाशिव देवाजी मंडरे रा.टोक तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील व सारुबाई सुरेश कस्तुरे वय ५० वर्ष रा. गणपुर हे दोघे बचावले आहे. तर पुष्पा मुक्तेश्वर झाडे वय ४५ वर्षे राहणार गणपुर, जिजाबाई दादाजी राऊत वय ५० वर्षे राहणार गणपुर या दोघांचे मृत्य देह सापडले असून शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे.
तसेच बुधाबाई देवाजी राऊत वय ५८ वर्षे राहणार गणपुर, श्वेता हरिचंद्र झाडे वय ३७ वर्षे राहणार गणपुर व मायाबाई अशोक राऊत वय ४० वर्षे राहणार गणपुर, सुषमा सचिन राऊत वय २५ वर्षे राहणार गणपुर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली ह्या सर्व महिला येथील रहिवासी आहेत.
गणपुर येथील पोलीस पाटील यांच्या पत्नीचा मृतदेह सापडला असून भावाच्या पत्नीच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू तर राऊत परिवारातील आई व पत्नीच्या मृतदेहाची व सुषमा राऊत च्या मृतदेहाची शोध म्हणून सुरू आहे. घटनास्थळावर गणपुर वासियांची तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गर्दी उसळली होती.
तसेच माहिती मिळताच घटनास्थळी खासदार अशोक नेते,प्रकाश गेडाम, प्रशांत वागरे,स्वप्निल वरघंटे, चामोर्शी पोलीस, गडचिरोली पोलीस , अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली, अनंत भांडेकर,एस.डी.पि.ओ. मयूर, बि.डि.ओ चामोर्शी, घोरुडे तहसीलदार चामोर्शी, तोडसाम एस.डी.एम. चामोर्शी, अतकरे मंडळ अधिकारी येनापुर, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल तसेच गणपुर येथील सरपंच उपसरपंच तंटामुक्त अध्यक्ष संपूर्ण गावकरी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली होती.
तसेच अशोक नेते खासदार यांनी घटनास्थळी आले असता मृतक महिलांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून केली आहे . सदर चीचडोहाचे पाणी कोणतीही पूर्व सूचना न देता पाणी सोडलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी यावेळी मृतक महिलांच्या कुटुंबीयांकडून व गावातील नागरिकांकडून खासदार अशोक नेते यांच्याकडे केलेली आहे. तसेच त्यांनी दिलासा दिला आहे, तसेच मृतकांच्या कुटुंबीयांना खासदार अशोक नेते यांनी दिलासा दिलेला असून गणपुर गावामध्ये शोककडा पसरली आहे . व आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच पुढील शोध मोहीम सुरू आहे.