चामोशीँ तालुक्यातील सोमनपल्ली गावातील थरारक घटना चुलत भावाने मित्राला सोबत घेऊन दोघांनी मिळुन चुलत भावाला जंगलात नेऊन जाळले …
ब्रेंकिग न्युज
दिनांक 6/11/ 2014 .
गडचिरोली /चामोर्शी
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
मुख्य संपादक
चामोर्शी तालुक्यातील येनापूर आष्टी महामार्गावरील येणापूर वरून तीन कि.मी अंतरावर असलेल्या सोमनपल्ली गावातील थरारक घटना आज दिनांक 6/11/2024 ला घडली .सदर ही घटना तिन ते चार वाजताच्या सुमारास घडली .
सोमनपल्ली येथील मृतक नामे श्री.मनोज मेकडतीवार अंदाजे वय 32वर्ष ,मु. सोमनपल्ली ता.चामोर्शी जि. गडचिरोली येथील रहिवाशी असून त्याला दोन मुली पत्नी व आई वडील तसेच लहान भाऊ असा परीवार आहे.
चुलत भाउ सचिन मेकडतीवार व मनोज मेकडतीवार या दोघा भावांमध्ये वैयक्तिक भांडण झाले त्या वैयक्तिक भांडणाचा राग मनात ठेवून, घरकुटुंब कापुस काढण्यासाठी शेतात गेल्याने घरी कोणी नसल्याचे संधी साधून सचिन व त्याचा मित्र राहुल गुंजनकर रा.चंद्रपूर या दोघांनी मनोज मेकडतीवार याला जमीनीवर खाली कोसळेपर्यत बेदम मारहाण केली त्यात मनोज मेकडतीवार हा जागीच ठार झाले तसेच, सचिन मेकडतीवार व त्याचा मित्र तेवढ्यावरच न थांबता त्याचा मुत्यु देहाचा विल्हेवाट लावण्यासाठी सापळा रचला आणि सोबत आपल्या स्वतःच्या दुचाकी वर घेऊन सोमनपल्ली वरुन येनापुरकडे निघाले असता, बुधवार येनापुर येथील बाजार पेठ असल्याने बाजारावरुन ये – जाण करणाऱ्या ल़ोकांनी बघितले तर सचिन यांनी दुचाकी चालवत तर मधोमध मुत्यक भाऊ मनोज आणि त्याच्या पाठी मागे सचिन चा मित्र हे येनापुर येथील मधोमध जंगलात दुचाकीने जात असल्याचे बघीतले त्यामुळे गावात सांगितले हि बाब लक्षात आली.
तसेच ते तिघेही काही वेळा घरीच दिसून न आल्याने लोकांनी त्या तिघांना येणापूर व सोमनपल्ली जंगलात दुचाकीने जात असल्याचे बघितले असता मनामध्ये शंका आली व त्या दिशेने जंगला ठिकाणी धाव घेतली असता घटनास्थळी मनोज मेकडतीवार याचा मृतदेह नग्न अवस्थेत काही अर्धवट जळालेला दिसून आला तसेच काही भाग जळालेला होता पाय व हाताचे पंजे दिसत होते सदर ही घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देताच घटनास्थळी आष्टी पोलीस दाखल झाले व पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत व तसेच या थरारक घटनेने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व गावात शोककळा पसरली आहे त्याच्यामागे दोन मुली आई-वडील व एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.