गॅस सिलेंडर घरपोच सेवा देणारा गॅससिलेंडर मागे घेतो २० रुपये
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

गॅस सिलेंडर घरपोच सेवा देणारा गॅससिलेंडर मागे घेतो २० रुपये …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली.(दि.६ नोव्हेंबर)
गडचिरोली आठवडी बाजार येथील कार्यरत श्री एच .पी.गॅस एजन्सी मध्ये काम करणारे . व ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर सेवा देणारे. गॅस सिलेंडर घरपोच पोहोचवीताना प्रत्येक गॅस सिलेंडर ग्राहकामागे प्रत्येकी वीस रुपये जोर जबरदस्तीने घेत असल्याचे ग्राहकाकडून सांगितले जात आहे.
गॅस घरपोच पोहोचवीणारा कधी कधी ग्राहकांना संतप्त वागणूक देत असल्याचे ग्राहकाकडून सांगितले जात आहे.
घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस विचारणा केली असता तुम्हाला एजन्सी कडून पगार भेटत नाही काय ? एजन्सी आम्हाला एक रुपया देत नाही.
आम्ही रोजीचे चे कामगार आहोत म्हणून आम्ही प्रत्येक ग्राहका मागे २०रूपये घेत असल्याचे ग्राहकांना सांगत असतो.
संबंधित एजन्सीने घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांची जातीने चौकशी करून यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी सिलेंडर धारकात केली जात आहे.