राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने केली, क्षेत्रसहाय्यकाच्या निलंबनाची मागणी!
कार्यकारी संपादक अनुप मेश्राम .

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने केली, क्षेत्रसहाय्यकाच्या निलंबनाची मागणी!
कार्यकारी संपादक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
अनुप मेश्राम.
दिनांक 26/2/25.
गडचिरोली ,
चामोर्शी तालुक्यातील कन्सोबा मार्कंडा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेले विजयनगर,गांधीनगर,कालीनगर या गाव परिसरातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांच्याकडे वन क्षेत्रसहाय्यक रमेश बानोत यांची तक्रार केले ली असल्याचे संगीतले जात आहे.
क्षेत्रसाहाय्यक रमेश बानोत यांनी आजुबाजूच्या गाव परिसरातील अनेक नागरिकांना वन.कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून सतत पैशाची मागणी करीत असल्याचे सांगितले जात आहे.
क्षेत्रसहाय्यक रमेश बानोत यांची
कारकिर्दी अतिशय भ्रष्ट प्रवृत्तीची असून आजु बाजूच्या गाव परिसरातील लोकांना सतत मानसिक त्रास देणारी असून दिवसेन दिवस क्षेत्र सहायकाची हुकूमत शाही अगदी शिगेला पोहोचलेली असल्यामुळे हम करे सो कायदा ही प्रवृती त्यांनी अंगिकारलेली आहे .अश्या भ्रष्ट प्रवूतीच्या क्षेत्र सहाय्यगाची त्वरित हकालपट्टी करून त्याला निलंबित करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशअध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी केली आहे.
क्षेत्र साह्यकास निलंबित न केल्यास मुख्य वनसरक्षक यांचे कार्यालया पुढे अनेक नागरिकांना हाताशी घेऊन जनआदोलनाचा इशारा सुध्दा सघटने ने दिलेला आहे.