आदर्श पदवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन .विद्यार्थ्यांकडून पारडी(कुपि) येथे राबविण्यात येणार विविध उपक्रम.
मुख्य संपादक

आदर्श पदवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन .विद्यार्थ्यांकडून पारडी(कुपि) येथे राबविण्यात येणार विविध उपक्रम.
गडचिरोली,
गोंडवाना विद्यापीठाचे घटक , आदर्श पदवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) पारडी (कुपि) येथे होणाऱ्या “ग्रामीण आरोग्य व स्वच्छतेसाठी युवाशक्ती” शिबिराचा उद्घाटन सोहळा गोंडवाना विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात ४ मार्च ला थाटात पार पडला. निवासी शिबिराच्या माध्यमातून पारडी कूपि गावामध्ये विविध उपक्रम आज पासून राबविण्यात येतील.
गोंडवाना विद्यापीठाचे प्र.कुलगुरू श्रीराम कावळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शिबिरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त, सामाजिक कार्य करण्याची संधी व प्रेरणा, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात हे स्पष्ट करत राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश्य व महत्व विशद केले. तर आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा कारू यांनी महाविद्यालयाच्या पहिल्या रासेयो शिबिरासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची ताकद युवाशक्तीमध्ये असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक स्व-विकासातून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास साधण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे शिबिरात उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी डॉ. संजय रायबेले (मा. जिल्हा समन्वयक रा. से. यो. भंडारा) यांनी विद्यार्थ्यांना केले. उद्घाटक श्री. संजयजी निखारे (मा. सरपंच, ग्रामपंचायत पारडी कुपी.) यांनी शिबिरार्थींचे स्वागत करत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. श्रीराम कावळे ( मा. प्र.कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली),प्रमुख अतिथी म्हणून श्री योगेंद्र शेंडे (मा. सहा. आयुक्त, कौशल्य विकास गडचिरोली), डॉ.कृष्णा कारू (प्राचार्य, आदर्श पदवी महाविद्यालय,गडचिरोली ) डॉ.प्रशांत ठाकरे (प्राध्यापक,गोंडवाना विद्यापीठ) डॉ.संजय डाफ (प्राध्यापक, गोंडवाना विद्यापीठ)डॉ. संजय रायबेले (मा. जिल्हा समन्वयक रा. से. यो. भंडारा),
श्री. घनश्याम मुरतकर (मा. उपसरपंच, ग्रामपंचायत पारडी कुपी.), मा.सपना नैताम(ग्रा.पं.सदस्य पारडी कुपी),संदीप निखुरे (ग्रा.स.),विश्वनाथ कोडापे ,धीरज चन्नेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह. प्रा.सुदर्शन जानकी यांनी तर आभार प्रदर्शन सह. प्रा.रेणुका गवारे यांनी केले.