आदर्श पदवी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप ! सक्षमीकरण शब्दाला पर्याय म्हणजे महिलाच ; डॉ. ठाकरे यांचे प्रतिपादन
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

आदर्श पदवी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप ! सक्षमीकरण शब्दाला पर्याय म्हणजे महिलाच ; डॉ. ठाकरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली ,
दिनांक 8/03/2025.
गोंडवाना विद्यापीठाचे घटक आदर्श पदवी महाविद्यालय यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सहा दिवसीय विशेष शिबिर ८ मार्च रोजी संपन्न झाले. या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.प्रशांत ठाकरे शिबिराच्या समारोपासह जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा कारू यांनी महाविद्यालयाच्या समोरच्या वाटचालीची दिशा निश्चित करत शिबिराच्या सफल आयोजनासाठी सर्वांचे अभिनंदन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.नंदकिशोर मेश्राम यांनीही सर्वांना महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
३ मार्च ते ८ मार्च दरम्यान पारडी कुपि गावांत सदर निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सहा दिवसात विद्यार्थ्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले .यामध्ये योग,प्रार्थना,पथनाट्य,आरोग्य शिबिर,व्याख्यान,श्रमदान इत्यादींचा समावेश होता.
या प्रसंगी मंचावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सह.प्राध्यापिका प्राजक्ता घोटेकर,डॉ.प्रीती भांडेकर,गीता बोगावर, सुदर्शन जानकी व कार्यक्रमात महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
* महिला सन्मान *
समारोपासह महिलादिनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
* पूर्वसंध्येला आकाश निरीक्षण सत्र *
गावातील वातावरण अतिशय शुद्ध आहे त्यामुळे रात्री आकासातील चांदण्या व नक्षत्र स्पष्ट दिसतात ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा कारू यांच्या मार्गदर्शनात डॉ. नंदकिशोर मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना विविध नक्षत्र, ग्रह व तारकापुंजांची माहिती दिली.हे शिबिर सर्वांसाठी ज्ञान व अनुभवाने परिपूर्ण असे होते.