देश-विदेश
पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू ! ५ जणांची प्रकृती गंभीर…
मुख्य संपादक

पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू ! ५ जणांची प्रकृती गंभीर…
पंजाब ,
पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. हे संपूर्ण प्रकरण मढई गाव आणि मजिठा येथील भागली गावाचे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्यातील मजिठा येथील मधाई गाव आणि भागली गावात विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.