
नक्षल्यांनी युवकाचे अपहरण करुन ….नंतर केली हत्या
पोलीस खबरी असल्याचा संशयातुन केली हत्या.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कांकेर :- दि.21 /11/2023.
जिल्ह्यातील कोयालिबेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नक्षल्यानी युवकाचेआधी अपहरण करुन नंतर जनता न्यायालय आयोजित करून हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडतीस आली. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे अमरसिंह उईके असे म् तक युवकाचे नाव आहे .
हत्येनंतर नक्षल्यानी अनेक ठिकाणी बँनर लावून त्याची जबाबदारीही घेतली असल्याचे कळते. दरम्यान घटणेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली असुन पुढील तपास करीत आहेत.
नक्षल्यानी हा युवक डिआरजीसाठि माहीती देणारा असल्याचा आरोप केला असुन 21 आँक्टोबर रोज ी झालेल्या चकमकीत त्या ने डिआरजी ला नक्षलवाघ्याचे ठिकाण सांगुन दोन निष्पाप तरुणांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे अमरसिंह उईके याना जनता न्यायालय स्थापन करून फाशीची शिक्षा सुनावली आहे. असे बँनर मघुन सांगितले जात आहे याघटणेने परीसरात दहशत पसरली आहे.