सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरु असलेल्या बांधकामाच्या रस्त्याची चौकशी करा: सागर मूलकला
मुख्य संपादक

सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरु असलेल्या बांधकामाच्या रस्त्याची चौकशी करा: सागर मूलकला
अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू – सागर मूलकला
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली:- जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागात असलेल्या सोमनपल्ली या गावात गेल्या 2017 – 2018 या वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोत्तुर ते सोमनपल्ली गावात आसरअल्ली ते पतागुडम जाणाऱ्या महामार्गाला जोडून चंद्र सलाय्या वेलादी (ग्राम पंचायत सदस्य) यांच्या घरापर्यंत लाखो रुपयांची डांबरीकरण रस्त्याची मंजुरी झाली आहे.
त्यावेळी संबंधित ठेकेदारांनी मंजुरी असलेल्या रस्त्याचे काम सुरुवात केली होती, त्या रस्त्यावर मुरूम आणि एक कलवाट बांधून अर्धे रस्त्याचे बांधकाम करून सोडून दिले आहे. आणि तीन / चार वर्षानंतर पुन्हा सोमनपल्ली गावात येऊन मंजुरी असलेल्या रस्त्याचे कामे न करता नवीन रस्त्या दुसऱ्या ठिकाणी सोमनपल्ली (माल) वार्ड क्र -१ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात सुरुवात केली आहे.
यावेळी सर्व ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारांना विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. त्यामुळे सोमनपल्ली गावात सुरु असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे संपूर्ण निकृष्ट दर्जाचे कामे केली जात आहे.
संबंधित ठेकेदारांनी मनमानी रस्त्याचे बांधकाम करीत आहे. सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचे बांधकामाला सखोल चौकशी होईपर्यंत रस्त्याचे बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा आम्ही सर्व सोमनपल्ली गावकऱ्यांनी येत्या 10 दिवसात 2 डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून दिला आहे.