Breaking
आरोग्य व शिक्षणसिरोंचा

सिरोंचा तालुक्यातून उत्कृष्ट खेळाडू घडतील:भाग्यश्री ताई आत्राम

मुख्य संपादक

 

 

सिरोंचा तालुक्यातून उत्कृष्ट खेळाडू घडतील:भाग्यश्री ताई आत्राम.

भाग्यश्री ताई फॅन्स क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

सिरोंचा  तालुक्यातील विविध गावात व्हॅलीबॉलसह क्रिकेट खेळाचा मोठा क्रेज आहे.मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही खेळांना विशेष महत्व देत दरवर्षीच याठिकाणी मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.तालुका मुख्यालयात तर क्रिकेट स्पर्धेची गेली अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असून या तालुक्यातून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केल्या.

१५ फेब्रुवारी रोजी तालुका मुख्यालयात भाग्यश्री ताई फॅन्स क्लब द्वारा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जितेंद्र शिकतोडे,अर्चना म्हरसकोल्हे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रवी रालाबंडीवार,विजय रंगूवार,श्रीहरी रामबंडीवार,राकॉ चे तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू,रा म कॉ चे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली, श्रीनिवास कडार्ला,रा यु कॉ चे अध्यक्ष एम डी शानु,नागेश्वर गागापूरपवार, नगरसेवक सतीश भोगे,सतीश राचर्लावार,रंजित गागापुरपवार, इम्तियाज खान,जगदीश रालाबंडीवार,सौ सपना तोकला, सौ माहेश्वरी पेदापल्ली,गणेश बोधनवार,रवी सुलतान,राजेश बद्दी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

पुढे बोलताना सिरोंचा तालुक्यात कुठल्याही खेळांचे आयोजन असू द्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून चांगले खेळाडू सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ दाखवतात.त्यामुळे येथील खेळाडूंना त्याचा मोठा फायदा होतो.त्यामुळे असे मोठे स्पर्धा आयोजन केले पाहिजे.त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे दरवर्षी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी उत्तम असे मार्गदर्शन करून खेळाडूंसोबतच आयोजकांनाही होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये,द्वितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ आणि आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या उदघाटनिय सामन्यात भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्वतः मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि युवा खेळाडू मध्ये स्फूर्ती निर्माण केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे