नागपूर महालक्ष्मी सरस उद्घाटन संपन्न;
महिला स्वयं सहाय्यता गटाच्या वस्तू गुणवत्तेच्याच
– मुक्ता कोकड्डे
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
प्रतिनिधी नागपूर दि. 17 – ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांचा दर्जा हा उत्तम व गुणवत्तेचाच असतो. महिलांना त्यांच्या उत्पादनांना विक्री करण्यासाठी मोठी बाजारपेठ महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण महिला फक्त लोणची आचार व पापड या पुरता मर्यादित न राहता कापड उद्योग, कलाकसुरीच्या वस्तू, विविध शोभेच्या वस्तू, ज्वेलरी अशी अनेक उत्पादने तयार करून बाजारपेठेत विक्री करीत आहेत. महिलांनी अशा सरस प्रदर्शनांसह फेसबुक youtube या साधनांचाही वापर करावा असे मत उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष सौ. मुक्ताताई कोकड्डे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रसंगी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती सौम्या शर्मा, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर उपायुक्त विकास श्री कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त आस्थापना श्री विवेक इलमे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर, श्री तुषार ठोंबरे, अवर सचिव एम एस आर एल एम श्री. धनवंत माळी, उपसंचालक श्रीमती. शितल कदम, जिल्हा परिषद नागपूरच्या महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती. अवंतिका लेकुरवाडे उपसंचालक महेश कारंडे यांच्यासह महिला,अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या ग्रामीण भागातील महिलांना फक्त संधी निर्माण करून देणे आवश्यक आहे. महिला त्यांचा उद्योग उभारून स्वतः सक्षम पणे तो विकसित करू शकतात. त्यामुळे मुंबई सोबतच नागपूर मध्ये महालक्ष्मी सरसचे आयोजन करून एक विक्रीची मोठी संधी महिलांना मिळाली आहे आणि प्रदर्शनाला नागपूर शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की उमेद अभियान आता राज्य, विभग आणि जिल्हा स्तरावर प्रदर्शन भरविण्या सारख्या उपक्रमाबरोबरच ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. येत्या वर्षभरातच महाराष्ट्रात १७ लाख महिला लखपती करण्याचा आराखडा कृती आराखडा तयार आहे. यापैकी १५ लाख महिला लखपती होण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबई यांच्या माध्यमातून दरवर्षी महालक्ष्मी सरस या राज्यस.।