आरोग्य व शिक्षणनागपुर
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय ! दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार ; 2026 पासून नवीन धोरण लागू
मुख्य संपादक संतोष मेश्राम

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय ! दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार ; 2026 पासून नवीन धोरण लागू
दिनांक 27/2/2025.
देशात दरवर्षी लाखो-करोडो विद्यार्थी CBSE बोर्डातून दहावीची परीक्षा देतात. यातील काही विद्यार्थी पास होतात, तर काही नापास होतात. अशा नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो. पण, आता 2026 पासून हा पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही. सीबीएसई बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने मंगळवारी त्याच्या मसुद्याला अंतिम मंजुरीही दिली.