नांदगाव (पोडे) मधील ४७ मंजूर पात्र लाभार्थ्यांची यादी नावासकट पंचायत समिती बल्लारपूर स्तरावरून गायब..! प्रितम पाटणकर
उपसंपादक - स्वप्निल मेश्राम

नांदगाव (पोडे) मधील ४७ मंजूर पात्र लाभार्थ्यांची यादी नावासकट पंचायत समिती बल्लारपूर स्तरावरून गायब..! प्रितम पाटणकर*
उपसंपादक –
स्वप्निल मेश्राम
चंद्रपूर :-
बल्लारपुर :- तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील ४७ गरजू घरकुल लाभार्थ्यांचे यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनेमध्ये नांदगाव ग्रामपंचायत स्तरावर दि. ३० जुन २०२३ रोजी ठराव मंजूर करून तहसील कार्यालय पंचायत समिती बल्लारपूर येथे लाभार्थ्यांच्या नावाची यादी पाठविली होती परंतु ४७ लाभार्थ्यांचे नाव वगळले गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ खापणे यांनी विसापूर मधील बल्लारपूर विधानसभा सचिव प्रितम पाटणकर युवक काँग्रेस चंद्रपूर यांच्यापर्यंत पोहोचविले.
तात्काळ या विषयाची दखल घेता विश्रामगृह चंद्रपूर येथे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय-भाऊ वड्डेटीवार यांच्याशी आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये नांदगाव पोडे गावामधील वगळलेल्या ४७ घरकुल लाभार्थ्यांचे विषय घेऊन विजय भाऊ वड्डेटीवार यांच्या समोर विषय मांडण्यात आले.
अशी माहिती बल्लारपूर विधानसभेचे सचिव प्रितम पाटणकर यांनी दिली.