Breaking
कोनसरीगडचिरोली

लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड प्रकल्प कोनसरीतील उद्योगाकरिता शेतजमिनीची दलाली करणाऱ्यांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ व गुलाल उधळून दिला चोप

मुख्य संपादक

 

 

लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड प्रकल्प कोनसरीतील
उद्योगाकरिता शेतजमिनीची दलाली करणाऱ्यांना  , गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ व गुलाल उधळून दिला चोप ! 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

गडचिरोली चामोर्शी 

कोनसरी 

उद्योगाकरिता शेतजमिनी  देण्यास  शेतकऱ्यांचा नकार…

दि ५/मार्च २०२४

गडचिरोली :   लॉर्ड्स मेटल ॲड एनर्जी लिमिटेड कंपनी कोनसरीतील  उद्योगाकरिता शेतकऱ्यांना जमिनी देण्यास परावृत्त करण्यासाठी आलेल्या दलालांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला असल्याचे उघडकीस आले आहे .चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन अधिग्रहित करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी याअगोदर रिकाम्या हाताने पाठवले आहे .

उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे  विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे, व जगायचे कसे असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता’ प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती अब्जो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोली (चक) २, जयरामपूर, पारडी (देव), सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली (तुकुम) या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे सुपीक असलेली शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाहीत. याविरोधात एकत्र येत या गावातील शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले होते.गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोली (चक) नं २, सोमनपल्ली या गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही गावात येऊ नये असे फलक लावण्यात आले आहेत वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचं कसं असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. गावकऱ्यांचे असे मत असताना लायड्स मेटल ॲड एनर्जी कंपनीचे काही दलाल शेतकऱ्यांना भुलथापा देउन जमीन देण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे वास्तव  अखेर आज समोर आले असून चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली या गावी जमीनीची दलाली करणाऱ्या चाणाक्ष डोनुजी संदुकवार आलापल्ली, आंबोलीचे सेवानिवृत्त ग्रामसेवक अरुण विठ्ठल उंदिरवाडे,शिवराम नारायण बारसागडे चामोर्शी यांना पकडून चांगलाच चोप दिला ,

 

असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे आणि समज देऊन सोडून देण्यात आले आहे अशीही माहिती पुढे आली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे