
अंगणवाडीच्या चिमुकल्यांना मिळणार नूतन इमारत
भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन.
अहेरी:तालुक्यातील आलापल्ली येथील प्रभाग क्रमांक तीन मधील अंगणवाडीच्या चिमुकल्यांना नूतन इमारत मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये सध्या असलेली अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असून या इमारतीच्या बांधकामाला बरेच वर्ष झाल्याने याठिकाणी नूतन इमारत बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी १४.७५ लक्ष रुपयांची निधी उपलब्ध करून दिली.
नुकतेच या कामाला प्रशासकीय मान्यतः मिळाली असून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.आता या प्रभागातील चिमुकल्यांना अंगणवाडीची नूतन इमारत मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला.
भूमिपूजन प्रसंगी सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,सदस्य पुष्पा अलोने,सोमेश्वर रामटेके,मनोज बोलूवार,स्वप्नील श्रीरामवार,राकॉचे कार्यकर्ते कैलास कोरेत,मुन्ना शेख,नरेश मादेशी, अक्षय डोंगरे,मिनाचंत डोंगरे,अंगणवाडी सेविका शबिना शेख तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.