अहेरी येथे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अमोल मुक्कावार यांच्या उपोषणाला भाग्यश्री ताई आत्राम यांची भेट ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

अहेरी येथे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अमोल मुक्कावार यांच्या उपोषणाला भाग्यश्री ताई आत्राम यांची भेट ।
भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपोषण
अहेरी,
विविध ज्वलंत समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक अमोल मुक्कावार,अमोल रामटेके,राहुल दुर्गे हे अहेरी येथील मुख्य चौकात उपोषणास आजपासून बसले आहे त्यात उपोषण स्थळाला भाग्यश्री ताई आत्राम यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
अहेरी ते प्राणहिता पोलिस उपमुख्यालय या रस्त्याचे डांबरीकरण मागील एका वर्षापासून रखडले आहे सर्वत्र धुळीचे वातावरण आहे त्यामुळे तत्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,अहेरी परिसरातील गडअहेरी,चेरपल्ली,इंदिरा नगर,गडबामणी येथे पाणी टाकी बांधण्यात यावी,नगर पंचायत क्षेत्रातील वन हक्क पट्टे प्रकरण तत्काळ वरच्या स्तराला पाठविण्यात यावे,अपंग बांधवांना अहेरी येथेच प्रमाणपत्र मिळावे,निराधार व श्रवण बाळ योजनेतील अनुदान महिन्याच्या एक तारखेला खात्यात जमा करावे अशा प्रमुख मागण्या आहेत.करीता उद्या दिनांक 25/02/2025 रोज अहेरी बंद चा हाक पुकार