
अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ ,AAP नेत्यावर होणार एफआयआर ; कोर्टाचा निर्णय .
दिल्ली ,
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केजरीवालांसह त्यांच्या पक्षाशी संबंधित इतर नेत्यांवर FIR दाखल करण्यात येणार आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे. अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या इतर नेत्यांवर सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे न्यायालयाने मान्य केले आहे.
न्यायालयाने द्वारका दक्षिण पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आणि एसएचओला 18 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी दंडाधिकारी न्यायालयाला निधीच्या गैरवापराच्या प्रकरणाची नव्याने सुनावणी करण्यास सांगितले होते.