
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाक् माँरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान, पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय .
मॉरिशस,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान तेथील पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी(11 मार्च) पंतप्रधान मोदींचा मॉरिशसच्या सर्वोच्च ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. पोर्ट लुईस येथे भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात रामगुलाम यांनी ही घोषणा केली.