बोलोरो – टु व्हिलरचा चकपिरंजी जवळ भिषण अपघात – विहीरगांवची महिला ठार.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली – चंद्रपूर ते सावली कडे जाणारी बोलोरो पिकअप चंद्रपूर वरून सावलीकडे भरघाव वेगात जात होती तर टु व्हिलर गाडी सुद्धा सावली कडे जात असतांना बोलारो पिकअप ने मागुनमोठी धडक दिल्यामुळे चकपिरंजी जवळ भिषण अपघात घडला यात विहीरगांव बोरमाळा ची महिला जागीच ठार झाली. तर दोघे गंभीर जखमी झाले.सदर व्यक्ति ही आपल्या नातेसंबंधातील नामकरण कार्यक्रमाला गेले असल्याची माहिती मिळत आहे.
आज दि. 22 जानेवारी सांयकाळी ७.३० चे दरम्यान एस.के. बार जवळ सार्वजनिक बांधकाम विभाग मुल डिव्ही कंपणीची बोलोरो पिकअप मुळे अपघात घडल्याचे कळते . अपघात एवढा भिषण होता की बोलोरो गाडीच्या चंक्याने टु व्हिलर गाडीला पाच फुट भरकडत नेले . यात शोभा धारणे ४९ विहीरगांव तालुका सावली हि जागीच ठार झाली तर निखील गायकवाड विहीरगांव आणि धर्मा पाडुंरग गायकवाड विहीरगांव असे जखमीचे नावे असुन ते सुध्दा गंभीर जखमी असुन त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे सावली पोलिसांनी भरती केले . तर मृत्युक शोभा हिला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या गळ्यात असलेला मंगळसुत्र गायब असल्याचे प्रत्यक्ष पाहणारे बोलत होते. सदर व्यक्ति ही आपल्या नातेसंबंधातील नामकरण कार्यक्रमाला गेले असल्याची माहिती मिळत असून या अपघाताला बघ्याची गर्दी जमली होती. सदर घटनेचा तपास सावली पोलीस करीत आहेत .