
विहिरीतील घाण साफ करण्यासाठी उतरले, गाळात अडकून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू
मध्यप्रदेश ,
मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. कुंदावत गावात विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या आठ जणांचा गाळात अडकून मृत्यू झाला. माहिती मिळताच खंडवा एसपी, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
नवरात्रीनिमित्त गावकऱ्यांनी गावात गणगौर मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. नवरात्रीनंतर गणगौर मातेच्या मूर्तीचे विसर्जन करायचे होते. त्यामुळे विहिरीची स्वच्छता करण्याचा विचार ग्रामस्थांनी केला. विहीर स्वच्छ करण्यासाठी काहीजण उतरले होते. पहिले तीन जण गाळात बुडाले, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य पाच जणांचाही बुडून मृत्यू झाला.