देश-विदेश
धक्कादायक ! जिवंत मासा तोंडात पकडला आणि 29 वर्षीय तरुणाचा जीव गेला
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

धक्कादायक ! जिवंत मासा तोंडात पकडला आणि 29 वर्षीय तरुणाचा जीव गेला
दिनांक 10/4/25.
तामिळनाडू ,
जाळ्याऐवजी हातानेच मासे पकडण्याची सवय असणाऱ्या २९ वर्षीय तरुणाला एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील मदुरंतकम येथे घडली आहे.२९ वर्षाचा मणिकंदन मासे पकडण्यासाठी तलावावर गेला. त्याने हाताने एक मासा पकडला. त्यानंतर दुसरा मासा पकडण्यासाठी त्याने हातातील मासा तोंडात धरला माश्याने तडफड केली आणि त्याच्या घशात गेला आणि फसला. पनंगोट्टई असे या माशाचे नाव आहे. या माशाच्या पाठीवर काटे असतात. हे काटे मणिकंदनच्या श्वसन नलिकेमध्ये फसले. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला. आणि नको तेच घडलं. मणिकंदनचा गुदमरून मृत्यू झाला.