
ब्रेकिंग न्युज
आणखी एक सुरजागड ट्रकचा अपघात ,जिवितहानी टळली !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
येनापुर प्रतिनिधी
आकाश बंडावार
मो.9579338750.
आष्टी / कोनसरी :-
सुरजागड वरून गडचिरोली कडे माल भरून जात असलेला ट्रक MH-.40- CM – 8657 कोनसरी समोरील वळणाजवळ अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुरजागड कडुन माल भरून जात असलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर सागवान झाडे तुडवत गेला व झाडाला जबर घडक दिल्याने ट्रक पलटी झाली परंतु त्यावेळी रस्त्याने ये – जाण कुणीही करीत नसल्यामुळे जिवितहानी टळली. ट्रक चालकही बचावला असुन कुठलीही जिवीतहाणी झाली नाही . सदर ही घटणा 4.30. वाजताच्या सुमारास घडली.
तसेच कोनसरी , सोमनपल्ली ,येनापुर, चित्तरंजनपुर, अड्याळ ह्या हायवेवर अनेक जिव गमवावे लागले आहे त्यामुळे सोमनपल्ली फाटा, तसेच येनापुर ,चित्तरंजनपुर अड्याळ या ठिकाणी खुप दळणवळण असते त्यामुळे सिक्युरिटी गाडँ देण्याची मागणी परीसरातील लोकांनकडुन केली जात आहे.