जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विद्युत विभागाची बैठक – मा. खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली
मुख्य उपसंपादक :- स्वप्नील मेश्राम

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विद्युत विभागाची बैठक – मा. खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य उपसंपादक
स्वप्नील मेश्राम
गडचिरोली .
जिल्हाधिकारी कार्यालयात गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार मा.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विद्युत विभागाची बैठक घेण्यात आली असुन या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी विजेच्या समस्या,कनेक्शन, थकबाकी, यांचा आढावा घेतांना विजवितरनातील प्रस्थावीत कामे लवकरात लवकर करण्याची तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांणा आणि घरकुलांना तातडीने वीज मिटर उपलब्ध करून देण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मिना, आमदार कृष्णा गजबे, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता आर के गाडगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे , आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संदीप कोरेत, कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कार्यकारी अभियंता डोंगरवर, हेडावू, कुमरे, तसेच महावितरणचे अनेक अधिकारी प्रामुख्याने उपस्थीत होते.
तसेच लोड सिडिंग टाळण्याकरिता व नविन विज विद्युत पुरवठा करण्याकरिता मंजुर सबटेशन चे काम तातडीने पूर्ण करावे ज्या ठिकाणी ट्रान्स्फारमरची वाढीव मागणी आहे. त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावणे तसेच जिल्ह्यात जे घरकुल मंजुर झाले आहे त्या घरकुलासाठी विद्युत विज पुरवठा तातडीचे उपलब्ध करून द्यावे तसेच कृषी पंप, डिमांड तसेच मिटर उपलब्ध करून द्यावे विजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी केबलिंग वापर करावा अशा अनेक मुद्यांवर खासदार अशोक नेते यांनी या बैठकीत विद्युत विभागाला निर्देश दिले आहेत.