गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये क्लास वन डॉक्टरांच्या पदभरतीची मागणी.!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये क्लास वन डॉक्टरांच्या पदभरतीची मागणी.!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
दि.18 .023
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली तीन,ते चार वर्षापासून क्लास वन डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असून, रिक्त असलेल्या जागेवर शासनाने क्लासवन डॉक्टरांची अजून पर्यंत पद भरती केलेलीच नसल्याचे सांगितले जातं आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयांत क्लास वन डॉक्टरांची ऐकून पदे 19 असून,डॉक्टरांची आजही 13 पदे रिक्त असून गडचिरोली रुग्णालयात सध्या कार्यरत क्लासवन डॉक्टरांची संख्या 6 असल्याची सांगितली जातं असून,काही मोजक्याच डॉक्टरांच्या खांद्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयचा डोलारा उभा आहे.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे प्रशस्त असुन् अनेक सोयी सुविधाने सुसज्ज असल्यामुळे यां जिल्हा रुग्णालयांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी रोजच येत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या,व रुग्णाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची पदे भरणे ही अतिशय गरजेची बाब बनलेली आहे.
तसेच यां रुग्णालयाला लाभलेले जिल्हा शल्यचिकित्सक हे कर्तव्यदक्ष,प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे., प्रशासनावर त्यांचे नियंत्रण असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालंयाचा प्रशासकीय कारभार हा सुरळीत चालत असून रुग्णालंयाने दिवसेंदिवस दिवस लोकप्रियतेची शीखर गठताना दिसत आहे.
रुग्णालयात गेली आठ ते दाहा वर्षापासुन कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे प्रस्ताव मंत्रालयात पाठविले असून, प्रस्ताव मंजूर करणे आता ती मंत्रल्याची बाब असल्याचे सदर आमच्या प्रतिनिधी जवळ आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अनुप मेश्राम यांनी केली आहे.