पुन्हा एकदा ! अबब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली व किष्टापुर येथे आज डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अवमानजनक लिखाण प्रकरणी बौद्ध बांधवाकडुन जाहिर निषेध….
बौद्ध बांधव आक्रमक... पोलीसात तक्रार दाखल अज्ञात इसमाला तात्काळ ताब्यात घ्या ! अन्यथा तीव्र रस्ता रोको आंदोलन ....

पुन्हा एकदा ! अबब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली व किष्टापुर येथे आज डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अवमानजनक लिखाण प्रकरणी बौद्ध बांधवाकडुन जाहिर निषेध….
बौद्ध बांधव आक्रमक… पोलीसात तक्रार दाखल
अज्ञात इसमाला तात्काळ ताब्यात घ्या !
अन्यथा तीव्र रस्ता रोको आंदोलन ….
आंबोली जि.प.प्राथ.शाळेच्या कंम्पाउड वर लिहुण , अश्लील काढलेले चित्रे
ब्रेकिंग न्यूज,
दिनांक 26/03/2025.
गडचिरोली ,
चामोर्शी तालुक्यातील आंबोली जि.प.प्राथमिक शाळा येथील संताप जनक घटणा …
आंबोली (येनापुर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली येथे आज दिनांक 26 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंड वरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अश्लील शब्दात शिवीगाळ व लिखाण व काही चित्रे अश्लील भिंतीवर काढली असून सकाळी शिक्षक शाळेवर आले तेव्हा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल घृणास्पद अवमान जनक लिखाण केलेले दिसून आले तेव्हा गावातील लोकांना व तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली व घटनास्थळी पोलीस येऊन त्या भिंतीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अवमानकारक लिखाण केलं ते काळ्या पेंटने पोलिसांनी मिटविले.
जि.प.प्राथमिक शाळा आंबोली येथील व्हिडीओ डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दल अवमानजनक लिखाण अज्ञाताने लिहिलेले लिखाण मिटवितांना आष्टी पोलिस …
तसेच पोलिसांना आंबोली येथील संपूर्ण गावकरी व बौद्ध बांधव व परिसरातील अनेक लोकांनी विचारले असता मुख्य आरोपी आम्ही या अगोदरच ताब्यात घेतलेला आहे. आणखी पुन्हा असे लिखाण कोण केलेला आहे याचा आम्ही शोध घेऊ एवढे बोलले गेले, या अगोदर सुद्धा सोमणपल्ली बस स्थानकावर आणि आंबोली शाळेच्या भिंतीवर लिखाण लिहिले होते आणि आज पुन्हा त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अवमानस्पद लिखाण केले आहे. आमच्या संपूर्ण बौद्ध बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि वारंवार हेच बाबासाहेब यांच्या बद्दल होत आहे.आरोपीला आष्टी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावा आणि कसून चौकशी करावी आणि अवमानजनक लिखाण करणाऱ्या आरोपीतांच्या मागे कुणाकुणाचा हात आहे यांच्यामध्ये याची संपूर्ण मुळे शोधून काढावी कोणते मोठे मासे अडकतील यावर कसून चौकशी करून त्या आरोपींना तात्काळ 24 तासाच्या आत ताब्यात घ्यावा .
किष्टापुर या ठिक ठिकाणी लिहिले आहे …
वारंवार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याच त्याच ठिकाणी पुन्हा ,पुन्हा अवमानजनक घृणास्पद लिखाण होत असेल तर अशा अज्ञात इसमाला पोलिसांची मुळीच भीती नसल्याचे दिसुन येते .अशी खमंग चर्चा प्रत्येक लोकांच्या तोंडून ऐकायला येत आहे. पोलिसांनी कसून चौकशी करावी .बौद्ध अस्मिता रक्षण समीती येनापुर यांची मागणी या अगोदर सोमनपल्ली व आंबोली शाळेवर लिखाण करणाऱ्या पुन्हा त्याच ठिकाणी लिखाण झाले आहे म्हणजेच काही मोठे मासे सुद्धा यामागे आहेत अशी सर्व ञ चर्चा गावा गावात ,संपूर्ण परीसरात केली जात आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनबद्दल अवमानकारक लिखाण व अश्लील चित्र काढणाऱ्या अज्ञात इसमाला आष्टी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेणार का? याकडे सर्व बौद्ध बांधव व संपूर्ण परीसरातील जनतेचं लक्ष लागले आहे.
एकाच महिन्यात पुन्हा तिच तिच घटणा व कृत्य
एकाच दिवशी दोन ठिकाणी आणि एकाच इसमाचे हस्ताक्षरने लिहिले आहे, आंबोली व किष्टापुर येथे लिखाण व अश्लील चित्रे ..लिहिणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घ्या ! बौद्ध बांधव व बौद्ध अस्मिता रक्षण समितीचे सर्व पदाधिकारी आणि परीसरातील जनतेची मागणी ..