
मध्यप्रदेशात भीषण अपघात । महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मुत्यु, कार पलटली…
मध्यप्रदेश,
दि.25/3/25.
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात फोरलेन हायवेवर भीषण अपघात झाला. यामध्ये अर्टिंगा कार पलटून कारमधील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चार डॉक्टर जखमी झाले आहेत.
हे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते. यावेळी लुकवासा पोलीस ठाणे क्षेत्रात शिवपुरी-गुना हायवेवर त्यांची कार अनियंत्रित झाली, यामुळे ती पलटी मारत पुलावरून खाली कोसळली.