
नागपूरात दंगल खोरांवर युपी स्टाईल कारवाई होणार ,दंगलीचा कथीत सुत्रधार फहिम खानच्या घरावर चालणार बुलडोझर…
नागपुर ,
दि 25/3/25.
सोमवारी महाल, हंसापुरीत झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडून मोठा धक्का देण्यात येणार आहे. यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे.
मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली असून सोमवारी अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडण्याची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर नागपुरातदेखील आता गुन्हेगारांवर ‘बुलडोझर’ने वचक बसविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे अशीच चर्चा आहे.