
टिम इंडियाच्या माजी क्रिकेटपटुच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
मुख्य संपादक संतोष मेश्राम .
दिनांक 4/10/2024.
पुणे :-
भारताचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सलील अंकोला यांच्या आईचं नाव माला अंकोला असं होतं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या घरात त्या एकट्याच राहत होत्या. दरम्यान, आज सकाळी कामवाली बाई घरी आली असता, त्या मृतावस्थेत आढळल्या. कामवाली बाईने तिच्या नातेवाईकांना माहिती दिली व त्यानी आल्यावर पोलिसांना माहिती दिली व पोलीस त्यानि घटणा स्थळी येऊन रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉ. तिला मृत घोषीत केले.तसेच तिला शवविच्छेदनासाठी पाठविले. व पुढील तपास सुरू आहे.