
उपचाराआधी पैसे न भरल्याने गर्भवतीचा मुत्यु ? रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले |
पुणे ,
दि.4/4/25.
पुणे शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासाने एका गर्भवती तरुणीला जीव गमावावा लागला असल्याची धक्कादायक घटना सुसंस्कृत पुण्यात घडली आहे. पैशांअभावी गर्भवतीला वेळीच उपचार मिळाले नाही. हॉस्पिटलने गेटवरूनच परत पाठविल्याने ऐन वेळी ॲम्ब्युलन्सही मिळाली नाही. तीव्र प्रसूती वेदना होत असताना वेळीच खाजगी गाडीने २५ किलोमीटवरील रुग्णालयात गर्भवतीला नेण्यात आलं. तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली.
तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मात्र त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला. जर वेळीच उपचार मिळाले असते तर गर्भवतीचा जीव वाचला असता. जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती शा शब्दांत पुण्यात त्या रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे रुग्णालय प्रश्नाकडून या आरोपाचे खंडन केले जात आहे.
‘गर्भवतीची शारिरिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. नातेवाईकांकडून खोटे व चूकीचे आरोप केले गेले आहेत. त्या संदभार्तचा अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर केला आहे. मीडियात सध्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे’ असं या रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणालेत.