आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
अमेरीकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर , व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांनमध्ये 50 टक्के भारतीय …
मुख्य संपादक

अमेरीकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर , व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांनमध्ये 50 टक्के भारतीय …
अमेरिका ,
दिनांक 21/4/25.
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतील स्थलांतर वकिलांच्या संघटनेने (एआयएलए) केलेल्या अहवालानुसार ३२७ जणांचे व्हिसा रद्द केल्याच्या प्रकरणातील सुमारे निम्मे म्हणजेच ५० टक्के विद्यार्थी भारतीय आहेत.