उमरेड हायवेवर भिषण अपघात ; अपघातात
12 गायी जागीच ठार …
ब्रेंकिग न्यूज .
दिनांक 6/10/2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य संपादक. संतोष मेश्राम .
नागपुर / उमरेड :-
दुःखद आणि दुर्दैवी!
राजुभाउ पारवे अपघात स्थळाची पाहणी करत कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या.
भरधाव वेगाने व नियमांचे उल्लंघन करून चालणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिक चिंतेत असतानाच आज (दि.६) सकाळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून बेसुर परिसरात भीषण अपघात झाला. ट्रकची जोराची धडक बसल्याने यात जवळपास १० ते १२ गायी जागीच ठार झाल्या.
सदरील ट्रक हा उमरेडहून सीर्सीकडे येत होता. अपघाताची माहिती समजताच राजु पारवे उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करत पोलीस प्रशासनास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या.