दिल्ली
दिल्लीतून एक धक्कादायक बातमी; शाहदरा परिसरात रामलीला साकारणाऱ्या व्यक्तीचा, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी; शाहदरा परिसरात रामलीला साकारणाऱ्या व्यक्तीचा, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
दिल्ली :-
दिनांक 6/10/2024.
दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहदरा परिसरात रामलीला साकारणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुशील कौशिक नावाचा कलाकार रंगमंचावर श्री रामची भूमिका साकारत असताना अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मंचावरून खाली जाऊ लागले.
हे पाहून लोक चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांची प्रकृती बिघडल्याने सुशील कौशिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत सुशील कौशिक याचे वय ५४ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.