
महाराष्ट्रात केली हत्या, थायलंडमध्ये पळण्याची तयारी , दिल्लीत पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या
क्राईम,
दिल्ली ,
महाराष्ट्रात हत्या करून थायलंडमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला पंजाब पोलिसांनी दिल्लीतील इंदिरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेट, मोहालीने अटक केलेल्या या दहशतवाद्याचं नाव सचिनदीप सिंग असं आहे. तो पंजाबधील अमृतसर येथील डायलपुरा गावातील रहिवासी आहे. हा दहशतवादी १० फेब्रुवारी रोजी नांदेड येथे झालेल्या हत्याकांडामध्ये सहभागी होता.