
माझ्या लेकाने माझ्या तोंडावर…’; पुण्यातील तरुणाच्या कृत्याची बापाला लाज ।
पुणे ,
“माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर माझ्या तोंडावर केली आहे… त्याच्या वर्तनाची मला लाज वाटते…” हे उद्गार आहेत मनोज अहुजा यांचे, जे गौरव मनोज अहुजा याचे बाबा आहेत. या मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला असून, तरुणाचा शोध सुरू आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद असून, त्याच्या घरच्यांनीही शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे.
Pune