
स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यत पोलीस कोठडी…
दोघांच्या संमतीने केले शारीरिक संबंध आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा ।
पुणे,
स्वारगेट बसस्टँड परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनीअटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला.
दोघांच्या संमतीने केले शारीरिक संबंध आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा ।
वासनांध दत्तात्रय गाडे, स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. आज अखेर तो सापडला. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले. शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत तो लपला होता. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले