देश-विदेश
धक्कादायक! भर दिवसा कोर्टा बाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

धक्कादायक! भर दिवसा कोर्टा बाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार …
जर्मनी,
जर्मनीतील बीलेफेल्ड शहरातील एका न्यायालयाबाहेरगोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रोफेशनल बॉक्सर बेसर निमानीच्या हत्येच्या खटल्यादरम्यान ही घटना घडली.तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की अचानक गोळीबार सुरू झाला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. स्थानिक पोलिसांनी तात्काळ परिसराला वेढा घातला आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या अनेक जर्मन वृत्तसंस्था असा अहवाल देत आहेत की, या गोळीबारात दोन लोक जखमी झाले आहेत.