आरोग्य व शिक्षण
कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना मृत्यूचा आणि गंभीर आरोग्य समस्यांचा धोका ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना मृत्यूचा आणि गंभीर आरोग्य समस्यांचा धोका !
मुंबई ,
कोरोना व्हायरसचा सामना करून रुग्णालयातून घरी परतलेल्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नवीन रिसर्चनुसार, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलेल्या लोकांना बरं झाल्यानंतर अडीच वर्षांपर्यंत मृत्यूचा आणि गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो. ‘इन्फेक्टियस डिसीजेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्समध्ये हे उघड झालं आहे, ज्यामध्ये फ्रान्समधील ६४,००० लोकांवर संशोधन करण्यात आलं.