
पुण्यात पुन्हा एक प्रकार , कॅब चालकाने महिला प्रवाशासोबत केले अश्लील कृत्य !
पुणे,
पुणे शहरातील एका आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या महिलेच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. यामुळे आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी परप्रांतीय २० वर्षीय कॅबचालकास अटक केली आहे.