दिल्ली
दिल्ली एनसीआरमध्ये पहाटे भुकंपाचे हादरे !,4.0रिश्टर भुकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप ।

दिल्ली एनसीआरमध्ये पहाटे भुकंपाचे हादरे ! 4.0रिश्टर भुकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप ।
दिल्ली ,
दिनांक 17/2/2025.
दिल्ली आणि एनसीआरमधील नागरिकांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झोप उडाली. सोमवारी पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी अचानक इमारती हलू लागल्या. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर धाव घेतली. भूकंपाचे हादरले बसल्यानंतरचे अनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र दिल्लीपासून जवळच पाच किमी अंतरावर किलोमीटर जमिनीमध्ये होते.