नागपुर
ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून खुल्या तेलाची विक्री । नागपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस
मुख्य संपादक

ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून खुल्या तेलाची विक्री ।नागपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस
नागपुर ,
दिनांक 17/2/2025.
अन्न पदार्थामध्ये भेसळ करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. असाच एक प्रकार नागपुरमध्ये समोर आला आहे नागपुर शहरात मागील काही दिवसांपासून हा प्रकार सूरु होता या बाबत पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर नागपुरातील क्राईम ब्रँच युनीट चार आणि हुडकेश्वर पोलिसांनी अदानी विलामार कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये बनावटी तेलाच्या डब्यावर ब्रँडेड स्टिकर कंपनीचे लावून मार्केट मध्ये विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान 7 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.