
संत्रानगरी नागपूर येथे कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि.28 /01/ 2024.
नागपुर
मैत्रिकट्टा कवी मनाचा साहित्य समूह संभाजीनगर द्वारा आयोजित दुसरे मैत्रिकट्टा साहित्य संमेलन २०२४ नागपूर येथे दिनांक २८.०१.२०२४ रोजी पुस्तक प्रकाशन सोहळा, पुरस्कार सोहळा अशा विविध सत्रात राज्यभरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.
त्यात गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या खेळेगावचे युवा कवी, लेखक. प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील साहित्यसंमेलनात सहभाग होता. त्यांनी आपली स्वलिखित “विचार केलास का कधी…?” प्रेमीयुगलांना हेलावून सोडणारी हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व मान्यवर, कवी, कवयित्री व जमलेल्या संपूर्ण रसिक वर्गाच्या टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकून घेतली.
त्यांचा असा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहुन उपस्थित मान्यवर कवी संमेलनाध्यक्ष मा. वैभव धर्माधिकारी पुणे (व्याख्याते तथा सदस्य साहित्य विचारपीठ मुंबई), संमेलनाध्यक्ष मा. अशोक कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक नागपूर) व विशेष अतिथी म्हणून लाभलेले प्रसिद्ध कवी, राज्य साथरोग शास्त्रज्ञ, फँड्री चित्रपटातील कलाकार, नागराज मंजुळे यांचे जिवलग मित्र मा. डॉ. प्रदिप आयटे सर यांच्या हातुन सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल त्यांचे आप्तजन, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी व गाववासीयांत आनंदाचा, आपुलकीचा, गर्वाचा गंध दरवळत आहे.