लाचखोर वैद्यकीय अधिकारी सापडला ला.प्र.वी.च्या जाळ्यात, एक लाख तीस हजार रुपयांची मागणी
मुख्य संपादक

लाचखोर वैद्यकीय अधिकारी सापडला ला.प्र.वी.च्या जाळ्यात, एक लाख तीस हजार रुपयांची मागणी
गडचिरोली:-
थकीत वेतनासाचे बिल काढण्यासाठी आरोग्य सहायकडून एक लाख 30 हजारांची रक्कम लाच म्हणून स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकिय अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हीं कारवाई दिनांक 26 मार्च बुधवारी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.
डॉ. संभाजी भोकरे असे लाचखोर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नाव आहे.
डॉ. संभाजी भोकरे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. याच आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी ते सप्टेंबर 2024 व नोव्हेंबर महिन्यातील 14 दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरिता डॉ. संभाजी भोकरे यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. या नाहरकत प्रमाणपत्रासाठी डॉ भोकरे यांनी दिड लाख रूपयांची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने आरोग्य सहायकाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तडजोडी अंती डॉ भोकरे यांनी एक लाख तीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक संतोष पाटिल, शिवाजी राठोड व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोग्य सहायकडून एक लाख तीस हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ भोकरे यांना रंगेहाथ पकडले.