देश-विदेश
आमच्याशी पंगा नको , शांत बसा ,नाहीतर ….उत्तर कोरीयाचे हुकुमशहा किंम जोंग उनकी धमकी …
मुख्य संपादक

आमच्याशी पंगा नको , शांत बसा ,नाहीतर ….उत्तर कोरीयाचे हुकुमशहा किंम जोंग उनकी धमकी …
उत्तर कोरीया
दि 26/3/25.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा राग कसा शेंड्यावर असतो हे साऱ्यांनाच माहीत आहे. ‘अरे’ला ‘कारे’ करायला त्यांना फार आवडतं आणि त्यामुळेच खरं तर ते जगात प्रसिद्ध आहेत. किम जोंग उन यांच्या रडारवर आता आहे तो म्हणजे जपान. सध्या जपानवर ते फारच भडकले आहेत.
त्यामुळे जपानलाही थेट धमकी देताना त्यांनी म्हटलं; ‘तुम्हाला सोडणार नाही, नष्ट करून टाकू. आमच्याशी पंगा घेतलात, तर त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही स्वत:हून कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आमच्या वाटेत आला तर त्याला सोडतही नाही’, या शब्दांत जपानला खडसावलं आहे.