
मोठ्या शहरांत मिळेल 30,520रुपये किमान वेतन ; सरकारने जाहीर केला मसुदा ।
मुंबई ,
दि.14/3/25
राज्यातील ग्राम पंचायतींची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढविण्यात येणार असून, त्या संबंधीची अधिसूचना कामगार विभागाने जारी केली आहे. त्यावर येत्या दोन महिन्यांत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा तीन वर्गवारींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे. तसेच शहरांची वर्गवारी परिमंडळ १, परिमंडळ २ आणि परिमंडळ ३ अशी करण्यात आली आहे. परिमंडळ एकमध्ये राज्यातील सर्व अ आणि ब वर्ग महापालिका, नगरपालिकांचा समावेश असेल.