Breaking
मुंबई

1867 बांधकाम कंत्राटदारांवर मुंबई प्रदुषीत केल्याचा ठपका ;नियमावलीचा भंग; पालिकेने पाच महिन्यात बजावल्या नोटिसा ।

मुख्य संपादक

 

1867 बांधकाम कंत्राटदारांवर मुंबई प्रदुषीत केल्याचा ठपका ;नियमावलीचा भंग; पालिकेने पाच महिन्यात बजावल्या नोटिसा ।

 

मुंबई .

प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग करणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच आहे. ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत एक हजार ८६७कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षीपासून नियमावली जारी केली आहे. बांधकामे आणि मोठे प्रकल्प वाढत्या प्रदूषणास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष न्यायालयानेही काढला होता. तेव्हापासून पालिकेने बांधकामे आणि प्रकल्पांच्या ठिकाणी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

बांधकामांच्या ठिकाणी धूळ उडू नये यासाठी आच्छादन लावावे, पाण्याची फवारणी करावी, स्प्रिंकलर बसवावेत, बांधकाम स्थळांवरून डेब्रिज घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या टायरची स्वच्छता करावी, बांधकामस्थळी काम करणाऱ्या मजुरांनी तेथे चुलीवर जेवण बनवू नये, अशी नियमावली पालिकेने प्रसिद्ध केली आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे