
नको मला बंगला- गाडी ,शोधेन मी निर्व्यसनी गडी !
मुंबई ,
दिनांक 14/02/2025.
व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत प्रेम करा, मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा असे आवाहन तरुणाईला करण्यासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्रच्या वतीने गुरुवारी मरीन लाईन्स येथे कॅम्पेन आयोजित केले. तरुणींनी ‘नको मला बंगला, गाडी… शोधेन मी व्यसनमुक्त गडी’ असा संदेश पोस्टरद्वारे दिला. विक्रोळीच्या संदेश महाविद्यालय-सिद्धार्थ महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचा संकल्प केला.